तेहरानः इराणचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह ( ) यांची तेहरानमध्ये हत्या ( ) करण्यात आली. या घटनेनंतर इराण आणि इस्रायलमधील तेढ वाढली आहेत. हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याचं इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं. फाखरीजादेहच्या यांच्या हत्येच्या प्राथमिक तपासात इस्रायल सामील असल्याचा गंभीर पुरावा मिळाला आहे, असं ते म्हणाले.

इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांच्या आरोपावर इस्रायलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी शास्त्रज्ञाची हत्या केली. या हत्येमुळे इस्रायल युद्धासाठी उत्सुक आहे, असं दिसून येतंय. हत्या करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव यापूर्वी बेंजामिन नेतान्याहू यांनी एका कार्यक्रमात घेतले होते, असं जरीफने यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

फाखरीजादेह यांची हत्या तेहरानजवळ झाली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यात ते गंभीर तो जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असं वृत्त स्थानिक संस्थांनी दिलंय.

२००३ पासून थांबवण्यात आलेल्या इराणच्या गुप्त अणुबॉम्ब कार्यक्रमाचं नेतृत्व फाखरीजादेह करत होते, असा आरोप बर्‍याच कालावधीपासून होतोय. पण इराणने अण्वस्त्रे बनवण्याच्या आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. ‘आम्ही या हत्येचा जोरदार बदला घेऊ आणि या घटनेमागे सामील असलेल्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल, असं इराणचे सैन्य कमांडर हुसेन देहघन यांनी ट्विट केलं आहे.

कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्त्रायलनेही इराणच्या आरोपाला उत्तर दिलेलं नाही. मोहसीन फाखरीजादेह यांना ‘द फादर ऑफ इराणी बॉम्ब’ असं संबोधलं जात होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here