मुंबई: राज्यातील संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज राज्यातील ‘ ‘कडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे. ( Latest News Updates )

वाचा:

राज्यात अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

वाचा:

राज्यात टप्प्याटप्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यातच दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यात कोणताही बदल होणार नसून तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०२० या वर्षात लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची आशा आता मावळली आहे.

वाचा:

दुसऱ्या लाटेचा धोका

दिल्ली व देशातील अन्य प्रमुख शहरात करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यात महाराष्ट्रातही करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून वेळीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीनंतर करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात घेऊन तातडीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. विमानतळावरही सशुल्क करोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळे खुली करताना तिथेही कठोर नियमावली ठेवण्यात आली आहे. त्यात आता लॉकडाऊनबाबतही अगदी सावध निर्णय सरकारने घेतला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here