मुंबईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार व भाजप यांच्यात लढाई पाहायला मिळतेय. मध्यतंरीच्या काळात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई ही महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची सुरुवात असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे, यावरुनच शिवसेना नेता यांनी व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार प्राताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग नाईक आणि पूर्वेश नाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीनं छापे मारली होती. सरनाईक हे प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या कंपनीत ब्रिटनहून मुंबई पोहोचलेल्या परदेशी निधीचा गैरवापर झाला, असा ईडीचासंशय आहे. सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेनेनं भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट करत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये सीबीआय आणि इडी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसंच, या ट्विटबाबत राऊतांना विचारलं असता, त्यांनी ज्यांना हे व्यंगचित्र समजलं, ते त्या भावनेनं घेतील, ज्यांना नाही समजलं ते अधिक सूड भावनेनं वागतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात ?

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात नेहमीच दबावाचं राजकारण केलं जातं, मात्र, संघर्ष करणं हा दोन्ही राज्यांचा स्वभाव आहे. दबावाच्या राजकारणानं जर तुम्ही महाराष्टात सत्तांतर करु शकता तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेतच, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. पंतप्रधान आमचे नेते आहेत. त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here