म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

चित्रपटसृष्टीत काम देण्याचे आमिष दाखवून परदेशी तरुणींकडून देहव्यापार करून घेणारे मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केले. अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये कारवाई करीत पोलिसांनी बॉलिवूडमधील एक निर्मिती व्यवस्थापक आणि कास्टिंग सूत्रधारास अटक केली. नावेद अख्तर व नाविद सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. देहव्यापार करण्यासाठी आणलेल्या तीन तरुणींची यावेळी सुटका करण्यात आली.

सेक्स रॅकेटविरोधातील कारवाई मुंबई पोलिसांनी तीव्र केली आहे. बॉलिवूडमधील निर्मिती व्यवस्थापक नावेद अख्तर आणि त्याचा साथीदार नाविद सय्यद हे दोघे बॉलिवूडमध्ये नशीब अजमावू इच्छिणाऱ्या तरुणींना काम मिळवून देण्याच्या आमिषाने वेश्याव्यवसायात ढकलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. समाजसेवा शाखेचे पोलिस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार केले. यातील एकाने नाविद आणि नसीमशी संपर्क साधला. ग्राहकाने मागणी केल्यानुसार हे दोघे तीन तरुणींना अंधेरी येथील एका बड्या हॉटेलमध्ये घेऊन आले. या बनावट ग्राहकाकडून पैसे घेत असतानाच पोलिसांनी नाविद आणि नसीम या दोघांना अटक केली तर तीन तरुणींची सुटका केली. गेल्या पंधरवड्यात पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले हे चौथे सेक्स रॅकेट आहे.

मॉडेलिंगचा बहाणा
पोलिसांनी या तरुणींची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. तीनपैकी दोन तरुणी या तुर्कमेनिस्तान या देशाच्या नागरिक असून शिकण्यासाठी भारतामध्ये आल्या होत्या. त्या पुणे येथील एका महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहेत. एका चित्रीकरणाच्या ठिकाणी या दोघींची नाविद आणि नसीमशी ओळख झाली. एका जाहिरातीसाठी मॉडेल हव्या असल्याचे सांगून या दोघांनी या तरुणींना मुंबईत बोलावले. तर एका महिलेने आपल्याला वर्सोवा येथील हॉटेलमध्ये पाठवल्याचे अन्य एका भारतीय तरुणीने पोलिसांना सांगितले. या तिघींचीही पोलिसांनी सुटका केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here