राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं सरकारच्या कारभाराचा पाढा वाचवण्यासाठी राज्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. , वाढीव वीज बील, शेतकऱ्यांना मदत या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सामना वृत्तपत्रातील मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. मुख्यमंत्री संविधानाची शपथ सुद्धा विसरले आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
‘राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल आहेत. सरकारी यंत्रणांचा मोठा गैरवापर केला गेला. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे. तसंच, आता न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री माफी मागणार का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत. अर्णव गोस्वामी किंवा कंगना यांच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही, पण विरोधी विचारांनी त्यांना चिरडून टाकायचं याच्याशी तर आम्ही बिलकूल सहमत नाही,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं
भाजपचं हिंदुत्व बदललं नाहीये शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्वाबद्दल बोलताना धोतर सोडल्याची भाषा कसली करतायेत? असा सवाल करतच त्यांनी ‘ज्या पक्षानं वारंवार सावरकरांवर टीका केली आज त्या पक्षासोबत सत्तेत आहात, अशी टीकाही केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times