मुंबईः न्यायालयाच्या एका निकालावर लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला यांनी नेत्यांना लगावला आहे.

कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ताशेरे ओढले आहे. तर, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणं ही चूक असल्याचं निरीक्षणं नोंदवले आहेत. या दोन निकालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सराकरवर निशाणा साधला असून आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचा आरोपही केला. फडणवीसांच्या या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बेकायदा बांधकाम पाडलं हा विषय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा होतो का? किंवा मराठी उद्योजकाच्या आत्महत्येस दोषी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली म्हणून राष्ट्रपती राजवट लावावी असं कोण म्हणत असेल त्यांना कायदा वाचण्याची गरज आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, या दोन्ही प्रकरणांमध्ये सत्तेचा व यंत्रणांचा गैरवापर झाला नाहीये, सत्तेचा गैरवापर कोण करतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे, असंही स्पष्ट केलं आहे.

फडणवीसांनीही धमकीची भाषा वापरली

‘सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कुठेही धमकीची भाषा वापरली असं मला वाटत नाही. पण फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे, असं विधान त्यांनी केलं होतं. ही भाषा भयंकर धमकीची होती. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पाहत होतात का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here