पुणे: करोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट येथे पंतप्रधान यांचे आगमन होताच, त्यांना पाहण्यासाठी ‘सिरम’च्या गेटवर जमलेल्या गर्दीतून स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शनिवारी करोनावरील लसीबाबत माहिती घेण्यासाठी पुण्यातील ‘सिरम’ला भेट देणार असल्याने सकाळपासूनच परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदी सिरम इन्स्टिट्युटमध्ये जात होते. त्याचवेळी सिरमच्या गेटसमोर जमलेल्या गर्दीतून काही तरुणांनी आसाराम बापूच्या सुटकेची मागणी केली. त्यांनी हातात फलकही घेतले होते. तसेच घोषणाही दिल्या. त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ तीन तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

आसाराम ७ वर्षांपासून तुरुंगात

बलात्कार प्रकरणात जवळपास सात वर्षांपासून तुरुंगात आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये आसारामला मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली होती. त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. एप्रिल २०१८मध्ये जोधपूर विशेष न्यायालयाने आसारामला दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here