मुंबई- अनुष्का शर्माने ऑगस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर बेबी बंपसह तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती गरदरपणात घ्यायच्या सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने बाळंतपणानंतरचे तिचे प्लॅन सांगितले. यात निर्मितीपासून अभिनयापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

अनुष्काला सेटवर मिळतो आनंद
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का आणि विराटच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. बाळंतपणाच्या काही महिन्यांनंत लगेच ती कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. याबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की, सेटवर तिला खूप आनंद मिळतो. मी आताही काही दिवस शूटिंग सुरू ठेवणार आहे. शूट दरम्यान संपूर्ण टीमसोबत खूप मजा येते.

अनुष्काची टीम आहे पूर्ण तयार
अनुष्का पुढे म्हणाली की, हे वर्ष सिनेसृष्टीसाठी वाईट राहिलं आहे. पण त्याच आनंदाने आणि नव्या दमाने पुन्हा कामाला सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व बाबींचा विचार केला होता. यात माझी टीमही खूप काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळत आहे.

अखेरच्या श्वासापर्यंक अनुष्काला करायचं आहे काम
डिलिव्हरीनंतर कामाला परत सुरवात करण्याबद्दल अनुष्का म्हणाली की, ‘बाळाच्या जन्मानंतर मी कामाला सुरुवात करणार आहे. एवढंच नाही तर घरी एक अशी यंत्रणा करेन की ज्याने घर, मुल आणि व्यावसायिक जीवन यात संतुलन राहिल. जोवर मी जिवंत आहे तोपर्यंत मला काम करण्याची इच्छा आहे. कारण अभिनयाने मला आनंद मिळतो.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here