मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाहचे व्यावसायिक आयुष्य उत्तम सुरू आहे. त्याचं प्रत्येक नवीन गाणं गाजत आहे. मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं येत आहेत. त्याची पत्नी जॅस्मिन यांचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जास्मिन आणि बादशाह अनेक महिन्यांपासून एकमेकांपासून दूर राहत आहेत. दोघांना अनेक दिवसांपासून एकत्र पाहण्यात आलं नाही. असं असलं तरी बादशाहकडून यासंदर्भात कोणतंही अधिकृत वक्यव्य आलेलं नाही. असं सांगितलं जात आहे की लॉकडाउनच्या काळात बादशाह मुंबईत राहत होता, तर त्याची पत्नी जास्मीन पंजाबमध्ये राहत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही लॉकडाउनची वेळ जास्मीन पंजाबमध्ये आहे आणि बादशहा मुंबईत आहे. कदाचित दोघांमधलं अंतर वाढलं आहे. त्याचवेळी, दुसर्‍या सूत्राने सांगितलं की, हे केवळ एक छोटसं भांडण आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. प्रत्येक जोडप्याच्या वाट्याला उतार-चढाव येत असतात.

बादशहा आणि जास्मीन यांनी २०१२ मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केलं. ११ जानेवारी २०१७ रोजी जास्मीनने मुलीला जन्म दिला. या दोघांनीही मुलीचं नाव जेसीमी ग्रेस मसीह सिंग ठेवलं. बादशहा बर्‍याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलताना दिसत नाही. त्याला आपल्या खासगी आयुष्यावर सार्वजनिकरित्या बोललेलं फारसं आवडत नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here