हिंगोली: शिवसेना आमदार यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते हे भाजपवर थेट हल्ला चढवत आहेत. अशा प्रकारची कारवाई भाजप नेत्यांवर होणार का, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार यांनी आज हिंगोली येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबाबत खूप मोठा दावा केला. ( Targets CM And )

वाचा:

‘प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असतानाच याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे. नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच राऊत जास्त फडफड करत आहेत. याच कारणामुळे राऊत हे यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे’, असे म्हणत नितेश यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रताप सरनाईक यांनी काहीतरी केले असेल तेव्हाच ईडीकडून त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यातही ते करोनाचे कारण काढून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही नितेश पुढे म्हणाले. नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. काहीही झाले की राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत मागत आहे. हे म्हणजे ‘माझ्या मुलाचे लग्न आहे आणि पैसे नाहीत म्हणून केंद्र सरकारने मदत करावी’ असा प्रकार आहे, असा टोला नितेश यांनी लगावला.

वाचा:

या सरकारने राज्याला ५० वर्षे मागे नेले

नितेश राणे हे भाजपचे हिंगोली जिल्हा प्रभारी असून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी ते येथे येथे आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी करोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. जनतेची कोणतीही कामे न करता महाराष्ट्राला बदनाम करण्याचे एकमेव काम या सरकारने केले आहे. गेल्या वर्षभरात काय केले ते न सांगता दुसरे काय करतात हे पाहण्यातच ते गुंतलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर स्वत:चे कुटुंब सोडून कोणाचीही जबाबदारी घेतलेली नाही, असा निशाणाही राणे यांनी साधला. महाविकास आघाडी सरकारने राज्याला ५० वर्षे मागे नेले आहे. राज्याच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर पुढच्या चार वर्षांत राज्य अधोगतीला जाईल. तेव्हा राज्य चालवता येत नसेल तर वेळीच राजीनामा देऊन खुर्च्या रिकाम्या करा, असेही नितेश राणे म्हणाले. राज्याच्या आर्थिक स्थितीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारणार, मागील एक वर्षात जनतेसाठी काय कामे केली? हे सांगायचे सोडून स्वतःच्याच माणसाला मुलाखत देऊन स्वतःचेच अभिनंदन करण्याचा हास्यास्पद प्रकार यांनी केला आहे, असा आरोपही नितेश यांनी केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here