मुंबई: राज्यात बाधितांचा आकडा आज किंचित खाली असून दिवसभरात ५ हजार ९६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ३ हजार ९३७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनाचे आणखी ७५ रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात करोनाने ४६ हजार ९८६ जणांचा बळी घेतला आहे. ( Latest News Updates )

वाचा:

राज्यात नंतर करोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढता राहिला आहे. आज मात्र त्याच थोडीशी घट पाहायला मिळाली. राज्यात काल शुक्रवारी ६ हजार १८५ नवीन रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज ५ हजार ९६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. करोनामृत्यूंचा आकडाही कमी झाला आहे. शुक्रवारी राज्यात ८५ मृत्यू झाले होते तर आज ७५ रुग्ण दगावले. सध्या राज्यातील २.५९ % एवढा आहे.

वाचा:

आज दिवसभरात राज्यभरात ३ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ७६ हजार ५६४ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९२.४ % इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ (१६.९२ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहे. राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून करोनाशी लढा सुरू असून अजूनही करोनाचं संकट संपलेलं नाही. दिवाळीदरम्यान दिल्लीसह देशातील काही मोठ्या शहरांत करोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. तोच धोका महाराष्ट्रालाही असून वेळीच सर्वती काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्राने आधीच गुजरात, , राजस्थान आणि या चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अहवालाची सक्ती केलेली आहे. विमानतळ व रेल्वे स्टेशन येथेही प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here