सिडनी, : उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारताल चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी देऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

भारतासाठी दुसरा वनडे सामना करो या मरो, असाच असणार आहे. कारण हा सामना गमावला तर भारतीय संघाचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे गेल्या सामन्यातील चुका सुधारण्यासाठी दुसऱ्या वनडेमध्ये दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. यामध्ये पहिले नाव आहे ते म्हणजे संजू सॅमसन.

आतापर्यंत संजूने भारतासाठी चार ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. पण एकही वनडे सामना संजूच्या नावावर नाही. आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये संजूने धमाकेदार फलंदाजी केली होती. त्याचबरोबर संजूला संघात घेतल्यास तो यष्टीरक्षणही कर शकतो. त्यामुळे लोकेश राहुलवरचा भार हलका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघात काही बदल करायचे झाल्यास उद्याच्या दुसऱ्या सामन्यात संजूला भारताकडून वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

गेल्या सामन्यात भारताची गोलंदाजी चांगली झाली नव्हती. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी या दोघांनी मिळून २० षटकांमध्ये १७२ धावा दिल्या होत्या. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीमध्ये उद्याच्या सामन्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या वनडेमध्ये भारताकडून युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. आयपीएलमध्ये नटराजनने भेदक गोलंदाजी केली होती. या आयपीएलमध्ये यॉर्कर किंग, अशी नटराजनची ओळख झाली होती. अखेरच्या षटकांमध्ये नटराजनने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे नटराजन चांगल्या फॉर्मात असून त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या वनडेमध्ये संजू आणि नटराजन यांना संधी द्यायची झाली तर कोणत्या खेळाडूंना वगळायचे, हा मोठा प्रश्न विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाकडे असेल. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका कोहली कसा सुधारतो, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here