वाचा:
भारत भालके यांच्या अंत्यसंस्काराला राज्याचे उपमुख्यमंत्री , पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, प्रणिती शिंदे, संजयमामा शिंदे , यशवंत माने यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. आज सकाळी ११ वाजता पुणे येथून भालके यांचे पार्थिव गुरसाळे येथे आणण्यात आले. तिथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढ्यात दर्शनासासाठी पार्थिव नेण्यात आले. दुपारी सरकोली येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव पोहचले. तिथेही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर चार वाजताच्या सुमारास अजित पवार, यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
वाचा:
अजित पवार यांनी यावेळी तीव्र शोक व्यक्त केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारत भालके आम्हाला सोडून गेले आहेत. भारत भालके हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. तीन निवडणुकीत तीन वेगळे पक्ष आणि वेगळी चिन्हे घेऊन जिंकून दाखवत त्यांनी ते सिद्ध केले. त्यामुळेच भालके यांनी मतदारांना जो काही शब्द दिला असेल तो शब्द आमचे सरकार पाळणार आहे. भालकेंनी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले आहे, ते आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी दिला.
वाचा:
दुसऱ्यांदा करोनाने गाठले आणि…
भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले होते. करोनामुळे त्यांना प्राणास मुकावे लागले. भालके यांना ३० ऑक्टोबर रोजी प्रथम करोनाची लागण झाली होती. त्यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, काहीच दिवसांत त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. तिथे चाचणीअंती त्यांना पोस्ट कोविड झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एकदा करोनावर मात केल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना करोनाने गाठले आणि त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times