रांची: बहुचर्चित प्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते (Lalu Prasad Yadav) यांना केली केली बंगल्यातून () रिम्सच्या पेईंग वार्डात शिफ्ट करण्यात आले आहे. पेईंग वॉर्डात गेल्यानंतर लालूप्रसाद यादव यांना करोनामुळे काळजी वाटू लागली आहे. तुरुंगाच्या नियमावलीनुसार, शनिवारी लालूप्रसाद यांना भेटण्यासाठी ३ लोकांना परवानगी देण्यात आली होती. ही सुविधा अजूनही त्यांना मिळत आहे. मात्र, आज कोणत्याही नेत्याने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी लालूप्रसादांची भेट घेतलेली नाही. ( worries about coronavirus infection)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केली बंगला येथून पेईंग वॉर्डात शिफ्ट झाल्यानंतर लालूप्रसाद यादव सर्वाधिक वेळ आपल्या खोलीतच असतात. बंगल्यात असताना मात्र ते सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारत असत. तसेच ते उनाचा देखील आनंद घेत असत. मात्र, पेईंग वॉर्डात संसर्गाचा धोका असल्याने लालूप्रसाद यादव आपल्या पेईंग वॉर्डातच वेळ घालवत आहेत. करोनाच्या संसर्गाची चिंता वाटत असल्याने लालूप्रसाद यादव स्वत: शनिवार असूनही पक्षाच्या कोणत्याही सदस्याला आपल्या भेटीची परवानगी दिलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल ऑडिओची फॉरेन्सिक तपासणीची तयारी
तर दुसरीकडे, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्या मोबाइलवर वार्तालापप्रकरणाचा तपास करण्यात रांची पोलीस गुंतलेले आहेत. रांचीतील बरियातू पोलिस ठाण्यात एफआयआरसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित ऑडिओची फॉरेन्सिक तपासणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात पुंदाग येथील राहणारे भाजप नेते अनुरंजन अशोक यांनी हा अर्ज दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
भाजपचे आमदार ललन पासवान यांच्याशी लालूप्रसाद यादव यांनी तुरुंगातून फेनद्वारे बातचित केल्याचा आरोप या एफआयआरमध्ये लावण्यात आला आहे. यामध्ये बिहार बिधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पासवान यांनी राष्ट्रीय जनता दलाला मदत करावी आणि त्या बदल्यात त्यांना मंत्रिपद देण्यात येईल असे लालूप्रसाद यादव पासवान यांना म्हणाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निवडणुकीदरम्यान पासवान यांनी सभागृहात गैरहजर राहावे असे लालूप्रसाद यांनी त्यांना सूचवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here