अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर सिनेजगतातील कलाकारांची ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली. सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी ही तपासणी सुरू केली गेली होती. पण ही तपासणी वेगवेगळ्या पैलूंमधून जाऊन अखेर ड्रग्ज प्रकरणावर येऊन थांबली. आणि तिचा नवरा यांच्यासोबत दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
भारती आणि हर्षा यांच्या घरात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला होता. या छाप्यात त्यांनी काही अमली पदार्थ जप्त केले. यानंतर दोघांना चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले. अखेर प्रदीर्घ चौकशीनंतर दोघांना अटक केली गेली. तेव्हापासून अशा बातम्या समोर आल्या आहेत की भारती सिंग यापुढे ‘द शो’मध्ये दिसणार नाही.
द कपिल शर्मा शोमधून भारतीला हटवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. पण शोचा होस्ट कपिल शर्मा याने त्याला विरोध केल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावरही त्याने आपला मुद्दा मांडला आहे. ‘द कपिल शर्मा शो’ हा फॅमिली शो असल्यामुळे तो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याकडे वाहिनीचा भर आहे. तर कपिल आणि भारती हे जवळचे मित्र आहेत. म्हणूनच तो या प्रकरणात तिचा बचाव करत आहे.
भारती सिंग प्रकरमात चॅनलने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कपिल आणि चॅनल दोघंही आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. जर दोघांमध्ये एक मत झालं नाही तर ‘द कपिल शर्मा शो’ संबंधीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times