वाचा:
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी नवखंडा महाविद्यालयात आयोजित सहविचार सभेत मलिक बोलत होते. यावेळी मलिक यांनी भाजप नेत्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली. विरोधी पक्षनेते , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री , माजी मुख्यमंत्री नारायण राणे असे भाजपचे राज्यातील प्रमुख नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं असतानाच भाजपने राज्यात प्रमुख ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर चौफेर टीका केली. या सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजप नेते सातत्याने सांगत आहेत. त्याला मलिक यांनी एकप्रकारे सडेतोड प्रत्युत्तर दिले व महाविकास आघाडी २५ वर्षे टिकणार असे सांगून सरकार भक्कम असल्याचाच दावा मलिक यांनी केला.
वाचा:
सतीश चव्हाण मागील दोन टर्मपासून जनसेवा करीत आहेत. या निवडणुकीतही त्यांना पाठबळ द्या, असे आवाहन यावेळी मलिक यांनी केले. मतदार चाणाक्ष असून पक्ष किंवा चेहरा बघून मतदान करीत नाही. बहुतांश मतदार हे उमेदवाराचे काम लक्षात घेऊन मतदान करतात. गेल्या १२ वर्षांतील काम पाहून मतदार यावेळीही मतदान करणार असल्याचे सतीश चव्हाण म्हणाले. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार राजेश राठोड, युसूफ उस्मानी, शेख मन्सूर मुस्तफा, छाया जंगले, डॉ. मकदूम फारुखी, मिर्जा सलीम बेग, एस. पी. जवळकर, सुरजितसिंग खुंगर, कैलास पाटील, शिवाजी बनकर, जकीयोद्दीन सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचा:
युवा सेनेचाही संकल्प
या मेळाव्यानंतर चव्हाण यांनी शहरातील विविध भागात मेळावे आणि सहविचार सभा घेतल्या. युवा सेनेचे कक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांच्या संयोजनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा सेनेचा विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. बारा वर्षांत मराठवाड्याचे प्रश्न आक्रमकपणे सतीश चव्हाण यांनी विधिमंडळात मांडले आहेत. त्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. चव्हाण हॅट्ट्रीक साधणार आहेत, असे जैस्वाल म्हणाले. यावेळी युवती प्रमुख डॉ. अश्विनी जैस्वाल, मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळ विभागाच्या वतीने गणेश मर्ढेकर यांच्या संयोजनात सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा घेण्यात आली. शहागंज येथील गांधी भवनात शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी संवाद मेळावा घेतला. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, प्रकाश मुगदिया उपस्थित होते.
वाचा:
युवा संवाद मेळावा
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर युवा संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, डॉ. उल्हास उढाण, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, पी. वाय. कुलकर्णी, काँग्रेसचे शहराध्यक्ष हिषाम उस्मानी, जितेंद्र देहाडे, विजय सुबूकडे, अमोल दांडगे उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times