विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी केंद्राच्या कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख (), द्रमुक नेते टी. आर. बालू (TR Balu), माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram yechury), भाकपचे सरचिटणीस डी. राजा (D Raja), राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा (Manoj Jha), भाकपचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य (Dipankar Bhattacharya), फॉरवर्ड ब्लॉकचे नेते देवव्रत विश्वास आणि आरएसपीचे सरचिटणीस मनोज भट्टाचार्य यांनी हे संयुक्त निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात हे नेते म्हणतात, ‘अश्रूधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करणे, रस्ते बंद करणे, पोलिसांनी बॅरिकेड्स लावणे आणि राजमार्ग खोदणे हे आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध छेडण्यासारखे आहे. आम्ही शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करत असलेल्या या शेकरऱ्यांचे समर्पण आणि धाडसाला सलाम करत आहोत.’ या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी दिल्लीतील बुराडी येथे एक मैदान देण्यात आले असून ते अतिशय छोटे आहे.
हे नेते पुढे म्हणतात, ‘या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी रामलीला मैदान किंवा तसेच एखादे दुसरे मोठे मैदान या शांततापूर्ण आंदोलनासाठी दिले जावे. तसेच या शेतकऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या भोजनाची देखील व्यवस्था केली जावी.’
क्लिक करा आणि वाचा-
या नेत्यांनी निवेदनाच्या शेवटी पुन्हा एकदा केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात विरोध प्रकट करत असल्याचे म्हटले आहे. हे कायदे भारताच्या खाद्य सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. तसेच या कायद्यांमुळे किमान समर्थन मूल्य देखील समाप्त होईल. तसेच शेती आणि देखील उद्ध्वस्त होतील, असे या नेत्यांनी शेवटी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times