मुंबई: लिफ्टमधून बाहेर येत असतानाच दरवाजात अडकून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी होऊन एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीतील येथे घडली आहे. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ( Latest News Updates )

वाचा:

क्रॉस रोडवरील पालवाडी येथील कोझी शेल्डर बिल्डिंगमध्ये शनिवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव असे आहे. ही बिल्डिंग सात मजली असून चौथ्या मजल्यावर शेख कुटुंब वास्तव्याला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोझी शेल्टर बिल्डिंगमधील रूम नं.४०२ मध्ये राहणारा मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा मुलगा त्याची ७ वर्षांची मोठी बहीण व ३ वर्षांची लहान बहीण यांच्यासोबत तळमजल्यावरून बिल्डिंगच्या लिफ्टमधून घरी चालले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचा लोखंडी दरवाजा सरकवून व बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर हुजेईफा हा बाहेर जात असतानाच दुर्घटना घडली. लिफ्टचा लोखंडी दरवाजा बंद करत असताना त्याला लगेच पुढे जाता आले नाही आणि लाकडी सेफ्टी दरवाजा बंद होऊन लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाजा यामध्ये अडकला व लिफ्ट वर जाताच खाली मोकळ्या जागेत कोसळला. या दुर्घटनेत गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फारच धक्कादायक असून लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे.

वाचा:

लिफ्टमध्ये मुलांना एकटं सोडू नका

याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यात संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही. उपनिरीक्षक संदीप सावंत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्याच्यावतीने रहिवाशी व पालकांना तातडीचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित बिल्डिंगमधील रहिवासी व पालक तसेच परिसरातील लिफ्ट असलेल्या अन्य बिल्डिंगमध्येही खबरदारी घेण्यात यावी. लिफ्टमध्ये मुलांना एकटे सोडू नये तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टचा वापर करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगावणे यांनी केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here