म. टा. विशेष प्रतिनिधी,

घर खरेदी-विक्रीच्या किमतीत जागतिक पातळीवर मोठी उलाढाल होत असते. जगातील १५० देशांच्या यादीत घरांच्या किमतीत घट होण्याच्या बाबतीत मुंबई १३५, तर १३८व्या क्रमांकावर आहे. घरांच्या चढ्या किमतीच्या बाबतीत हैदराबाद १४व्या स्थानावर असून, या शहरात घरांच्या किमतीत दरवर्षी ९ टक्के वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

नाइट फ्रँक या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार संस्थेने त्यांचा ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्स हा सन २०१९चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जगातील १५० शहरांतील खरेदी विक्रीतील चढउताराचा आढावा घेण्यात आला आहे.

मुंबईतील घरांच्या किमतीत ३ टक्क्यांनी, तर पुण्यातील घरांच्या किमतीत ३.५ टक्क्यांची घट आल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांत भारताच्या आठ अव्वल शहरांमधील घरांच्या किमतीमधील वाढ किरकोळ महागाईच्या वाढीपेक्षा कमी राहिलेली आहे. फक्त हैदराबाद शहराने दरवाढ कायम राखली आहे. या अहवालात जगातील १५० शहरांपैकी ७८ शहरांच्या मालमत्तांचा आढावा घेण्यात आला.

घट का?
मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरबांधणी होत आहे. मात्र चढ्या किमतीमुळे ग्राहकांनी घराकडे पाठ फिरवली आहे. मागणी कमी व निर्मिती जास्त आहे. परिणामी घरांच्या किमती काही प्रमाणात कमी करणे विकासकांना भाग पडले आहे. तरीही मुंबईत घर घेणे परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

वाढ का?
हैदराबादमध्ये मागणीच्या तुलनेत घरांची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे जी काही घरे शिल्लक आहेत, त्याकडे ग्राहक वळले. मागणी वाढल्याने साहजिकच किमती वाढल्या.

दरवाढीची शहरे
हैदराबाद : ९ टक्के दरवाढ, १४वा क्रमांक

दिल्ली : ३.२ टक्के वाढ. ७३ क्रमांक

बेंगळुरू : २ टक्के वाढ. ९४ क्रमांक

अहमदाबाद : १.१ टक्के वाढ, १०८ क्रमांक

दर घटलेली शहरे
कोलकाता : २ टक्के घट, १३० क्रमांक

मुंबई : ३ टक्के घट, १३५ क्रमांक

चेन्नई : ३ टक्के घट, १३६ क्रमांक

पुणे : ३.५ टक्के घट, १३८ क्रमांक

घरांच्या किमतीत भरमसाठ वाढ. अन्य देश
बुडापेस्ट, हंगेरी : २४. १ टक्के. पहिला क्रमांक

शीन, चीन : १५.९ टक्के. दुसरा क्रमांक

बुहान, चीन : १४.९ टक्के. तिसरा क्रमांक

झगरेब, क्रोएशिया : १४.५ टक्के. चौथा क्रमांक

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here