अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. (BSF Jawan in Honey Trap)

नगर तालुक्यातील ससेवाडीतल काळे बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. २०१९ पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीला आहे. फेसबुक आणि व्हॅटसॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिला एजंटाशी त्याचा संपर्क झाला. त्या महिलेने त्याला गोड बोलू जाळ्यात अडकविले. त्यानंतर काळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॅटसॅप ग्रूप तयार केला. त्या पाकिस्तानी महिला एजंटालाही ग्रूपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रूपवर पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कोठे आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कोठे असणार आहे. याची माहिती जवान ग्रूपवर देत असत. ती त्या महिलेला मिळत होती. ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.

वाचा:

या हेरगिरीची माहिती कळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. माहितीत तथ्य आढळून आल्यानंतर चौकशीनंतर पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा पंजाब पोलिसांचा प्रयत्न आहे. लष्करी जवानांना सोशल मीडियाच्या वापरासंबंधी अलीकडेच बंधने घालण्यात आली आहेत. तरीही काही जवानांनाकडून याचा भंग होत असल्याने कळत न कळत ते अशा हनी ट्रॅपपमध्ये अडकत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

काळे शेतकरी कुटुंबातील आहे. गावाकडे त्याची अवघी तीन एकर शेती आहे. वडील धार्मिक वृत्तीचे असून दरवर्षी पंढरीची वारी करीत असल्याची माहिती गावातून मिळाली. अत्यंत गरीब परिस्थितीतून वडिलांनी मुलाचे शिक्षण केले. दहा वर्षांपूर्वी प्रकाश बीएसएफमध्ये भरती झाला आहे. त्याच्याकडून असे कृत्य घडल्याबद्दल गावकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here