वाचा:
ताडमेटला परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात ‘कोबरा २०६’ बटालियनचे १० जखमी झाले. त्यात नितीन भालेराव यांचा समावेश होता. जखमी जवानांना उपचारासाठी तात्काळ रायपूर येथे विमानानं हलविण्यात आलं. मात्र, भालेराव यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, अन्य सात जवानांवर उपचार सुरू आहेत. दोघांवर चिंतलनार येथील सीआरपीएफच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.
नितीन भालेराव यांचं कुटुंब नाशिकच्या राजीव नगर भागात वास्तव्यास आहे. ‘नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव हे छत्तीसगढ मध्ये शहीद झालेले आहेत. सध्या त्यांचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईत आणलं जाईल व तेथून ते नाशिकला आणलं जाईल. त्यानंतर नातेवाईकांशी चर्चा करून त्यानुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times