हैदराबादच्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित हा यांच्या दौरा पाहता शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
भाजपच्या या नेत्यांच्या झाल्या सभा
या पूर्वी हैदराबादमध्ये अनेक मंत्र्यांच्या सभा झाल्या. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हैदराबादमध्ये सभा घेतली. आपल्या भाषणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबाद शहराचे नाव बदलून ते भाग्यनगर असे करण्याबाबतचा उल्लेख केला होता. यानंतर या मुद्द्यांवर राजकारण चांगलेच तापलेले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हैदराबादचे नाव कदापि बदलणार नाही- ओवेसी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या हैदराबाद दौऱ्यात हैदराबादचे नाव बदलून ते भाग्यनगर असे करण्याचे आश्वासन तेथील मतदारांना दिले आहे. त्यावर ओवेसी यांनी पलटवार केला आहे. जी व्यक्ती हैदराबाद शहराचे नाव बदलू इच्छिते त्या व्यक्तीच्या पिढ्या बरवाद होतील, मात्र हैदराबाद शहराचे नाव बदलणार नाही, असे ओवेसी म्हणाले. ‘हम अली के नाम लेवा है हम तुम्हारा नाम तब्दील कर देंगे, असे ओवेसींंनी सुनावले .’जे लोक शहराचे नाव बदलू इच्छितात त्यांना तुम्ही उत्तर द्या असे माझे तुम्हाला सांगणे असल्याचेही असदुद्दीन ओवेसी हैदराबादच्या मतदारांना उद्देशून म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times