सांगली: ‘मला भेटायला रोज हजारो लोक येतात. कोणी उमेदवार मला भेटला याचा अर्थ मी त्यांना पाठिंबा दिला असा होत नाही. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आमचे दरवाजे नेहमीच खुले असतात. आम्ही भाजपच्या उमेदवारांसोबतच आहोत,’ असे म्हणत खासदार यांनी पुणे पदवीधरचे उमेदवार यांना पेढे भरवत भाजपचाच उमेदवार निवडून येणार असे भाकीत केले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सर्वच उमेदवारांकडून नेत्यांच्या गाठीभेटी घेणे आणि पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी चार दिवसांपूर्वी साताऱ्यात खासदार उदयनराजे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख साताऱ्यात असूनही उदयनराजे आणि देशमुख यांची भेट होऊ शकली नव्हती. यावरून उदयनराजेंच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यानंतर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी उदयनराजे यांची भेट घेतली.

वाचा:

या भेटीनंतर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, ‘मला भेटायला रोज हजारो लोक येतात. प्रत्येकाचे आदरातिथ्य करणे माझे कर्तव्य आहे. भेटलो म्हणून गैरसमज नको, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्यासोबत आहोत. ते खूप चांगले काम करतील हा माझा विश्वास आहे. संग्राम देशमुख माझे जुने मित्र आहेत. त्यांच्या स्वागतासह विजयाचाही पेढा त्यांना भरवला आहे.’

वाचा:

‘यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. याची पोचपावती निश्चितपणे यंदाच्या निवडणुकीत मिळेल. उमेदवारांसह आणि मित्र पक्षांचे सर्व नेते, कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करीत आहेत. निवडणुकीत निश्चित यश मिळेल,’ असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ उपस्थित होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here