भारतीय जनता पक्षाला अपार समर्थन दिल्याबद्दल मी हैदराबादच्या लोकांचे आभार मानत असल्याचे अमित शहा म्हणाले. या वेळी भारतीय जनता पक्ष आपल्या जागा वाढवण्यासाठी किंवा आपली स्थिती मजबूत करण्यासाठी निवडणूक लढत नाही, मात्र यावेळी हैदराबादचा महापौर भाजपचा होईल, असे अमित शहा म्हणाले.
हैदराबाद महापालिकेच्या १५० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १ डिसेंबरला मतदान होत आहे. तर मतमोजणी ४ डिसेंबरला होणार आहे.
अमित शहा हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो करत आहेत. अमित शहा यांनी सिकंदराबाद येथे रोड शो केला. आज संध्याकाळी ६ वाजता महापालिकेचा निवडणूक प्रचार संपणार आहे. हे पाहता भाजपने टीआरएसकडून पालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी मतदानापूर्वी शुक्रवारी शहरात मोठा प्रचार केला होता. तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शो केला होता.
ओवेसींनी सोडले टीकास्त्र
हैदराबाद महानगरपालिकेची ही निवडणूक हैदराबाद निवडणुकीसारखी मुळीच वाटत नाही, तर असे वाटते की आम्ही पंतप्रधान मोदींच्या जागी नव्या पंतप्रधानांची निवड करत आहोत की काय, असे ओवेसी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
भाजपने या निवडणुकीसाठी सर्व प्रमुख नेत्यांना बोलावले, आता फक्त डोनाल्ड ट्रम्प तेवढे हैदराबादेत याचचे बाकी आहेत. जरी डोनाल्ड ट्रम्प आले तरीही काही होणार नाही. कारण त्यांचाही हात हातात घेऊन ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असे मोदी म्हणाले होते. मात्र ट्रम्प देखील वाचले नाहीत आणि खड्ड्यात कोसळले, असे ओवेसी म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times