वाचा:
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला गेला. मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा विचार का केला गेला नाही? त्यावेळी सत्तेत असलेल्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही. आज सत्तेत असलेल्यांना या प्रश्नाची सखोल माहिती आहे. मोठे लोक आहेत. त्यांनीच हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे,’ असं म्हणत उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
वाचा:
यांचं उदयनराजेंनी कौतुक केलं. ‘फडणवीस हे मराठा समाजाचे नसताना त्यांनी आरक्षणाचा प्रश्न रेटून नेला. त्यांनी जातपात बघितली नाही. त्यांना जमते तर तुम्हाला का जमत नाही,’ असा प्रश्न त्यांनी केला. किती दिवस तुम्हाला ‘मराठा स्ट्राँग मॅन’ ही उपमा द्यायची, असा चिमटा उदयनराजे यांनी यांचं नाव न घेता काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन तुम्हा या संदर्भात चर्चा करणार का असं विचारलं असता, ‘नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार नसेल तर चर्चा करण्यात काय अर्थ आहे?, असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times