टोकियो: जपानमध्ये वर्षभरात जेवढे करोनाने बळी घेतले नाहीत, त्यापेक्षाही अधिक जणांचे मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाल्याचे समोर आले आहेत. जपानमध्ये करोनामुळे २०८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, फक्त ऑक्टोबर महिन्यातच आत्महत्या केल्यामुळे २१५३ जणांचा मृत्यू झाला आहे. जपान सरकारने जारी केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

जपानची लोकसंख्या जवळपास १२ कोटींच्या आसपास आहे. आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या एक लाख ४२ हजार इतकी नोंदवण्यात आली. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, करोनामुळे जपानमध्ये २०८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरीकडे करोना महासाथीच्या आजारामुळे अनेकांचे आयुष्यावर परिणाम झाला आहे. अनेकजण तणावात आहेत. नोकरीवर गडांतर, पगार कपात, आर्थिक समस्यांमुळे ताण-तणावावर भर पडली आहे. करोना महासाथीच्या आजारामुळे लोकांच्या मानसिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला होता. आत्महत्या प्रकरणाबाबतचा डेटा जाहीर करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये जपानचा समावेश होतो. अमेरिकेने २०१८ नंतर आत्महत्येबाबतचा डेटा जाहीर केला नाही. जपानच्या आकडेवारीवरून इतर देशांमधील परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

वाचा:

टोकियो विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि आत्महत्यांबाबतच्या प्रकरणांच्या अभ्यासक मिशिको उएडा यांनी सांगितले की, जपानमध्ये लॉकडाउन देखील नाही. इतर देशांच्या तुलनेने जपानमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. अशी परिस्थिती असतानाही आत्महत्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इतर करोनाप्रभावित देशांमध्ये ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

वाचा: वाचा:

जपानमध्ये आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. वर्ष २०१६ मध्ये आत्महत्यांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दर एक लाख नागरिकांमागे १८.५ इतकी होती. दक्षिण कोरियानंतर हा दर अधिक होता. तर, जागतिक पातळीवर आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दर एक लाख नागरिकांमागे १०.६ इतके होते.

वर्ष २०१९ मध्ये जपानमध्ये २० हजार जणांनी आत्महत्या केली होती. तर, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या आत्महत्या दरात ८३ टक्के वाढ झाली. तर, पुरुषांमध्ये आत्महत्या करणाऱ्यांच्या प्रमाणात २२ टक्के वाढ झाली होती. करोना महासाथीमुळे महिलांवर अधिक परिणाम झाला असण्याची शक्यता या आकडेवारीतून वर्तवण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here