या मुळे लाखो बंधु-भगिनींना रोजगार मिळेल असे गोयल म्हणाले. गोयल यांनी राजस्थानातील अलवर येते ढिगावडा रेल्वे स्थानकावर ढिगावडा-बांदीकुई रेल्वे विभागात रेलमार्ग विद्युतीकरणाचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
एक काळ असा होता की रेल्वे स्थानकात केवळ कुल्हडमध्येच चहा मिळत असे. जेव्हा सन २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हापर्यंत रेल्वे स्थानकांमधून गायब झाले होते. त्यांच्या जागी प्लास्टिकच्या कपातून चहा द्यायला सुरुवात झाली, असे गोयल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
रेल्वेमत्री पीयूष गोयल यांनी बोलताना पुढे सांगितले की, खादी ग्रामोद्योग विभागाच्या लोकांनी रेल्वेच्या सहकार्याने या कामाला गती दिली. मी आता कुल्हडमध्ये चहा पीत होतो आणि खरेतर कुल्हडमधील चहाची चव काही औरच आहे. पर्यावरणाला देखील याचा फायदा होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये सत्तेत आले आणि तेव्हा पासून ते लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. दरम्यान देशभरातील रेल्वे लाइचे शंभर टक्के विद्युतीकरण केले जाईल असेही गोयल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times