कालच्या तुलनेत आज ४२१ रुग्ण कमी आढळल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात दिवाळीनंतर करोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत असताना काल पासून या आकड्यात घट होताना दिसत आहे. राज्यातील जनतेसाठी हे दिलासा देणारे वृत्त आहे. मात्र कालच्या तुलनेत मृत्यू काहीसे अधिक झाले आहेत. कालची तुलना केल्यास मत्यूमध्ये आज १० रुग्ण अधिक दगावले आहेत.
आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. या बरोबरच राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून एकूण ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,०४,४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२०,०५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णसंख्यावाढीत किंचितशी घट झाल्याचे दिसत असले तरी करोनाचे संकट टळलेले नाही. महाराष्ट्र सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशातील राज्यांपैकी एक आहे. दिवाळीनंतर दिल्लीत करोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रातही विशेष काळजी घेतली जात आहे.
क्लिक करा आणि वाचा-
खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्राने दिल्ली गुजरात, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोनाची चाचणी करूनच येण्याची सक्ती केले आहे. राज्यातील विमानतळे आणि रेल्वे स्थानकांमध्येही प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times