म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

आयुका संस्थेच्या मूळ उद्देशांमध्ये अशा प्रकारे कोणत्याही साहित्यिकाच्या साहित्यावरील स्वीकारण्याचा समावेश नसून आयुका तरीही गोळा करीत असलेली रॉयल्टी ही बेकायदा असून ती संबंधितांना तातडीने परत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुल व सुनिताबाई यांचे कायदेशीर वारस असलेले त्यांचे कुटुंबीय त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी एक न्यास स्थापन करण्याची इच्छा बाळगून असल्याचेही या पत्रात नमूद केले गेले आहे. पुलं व सुनिताबाई यांच्या साहित्याच्या रॉयल्टीमधून मिळणारे उत्पन्न याचा वापर कोणीही कुटुंबीय स्वतःच्या फायद्यासाठी करू इच्छित नसल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आयुकाने दिलेल्या सुनिताबाईंच्या मृत्युपत्राच्या सत्यतेबद्दलच या कुटुंबीयांना आक्षेप असून ते आयुकाला कसे मिळाले याचा खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर हे मृत्युपत्र व त्याच्या अंमलबजावणीबाबतही अनेक तांत्रिक मुद्दे यामध्ये उपस्थित केले गेले आहेत.

मृत्युपत्र देण्यास टाळाटाळ

‘आमचा पुतण्या यश देशपांडे हा कलाकार असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णवेळ रंगभूमीवर काम करू इच्छितो. त्याने अर्थातच पुलंच्या साहित्यावर काही कलाकृती करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस आयुकाने त्याला दहा पानी पत्र पाठवून अनेक विचारणा केल्या. दुसऱ्या बाजूला एका चित्रफितीला कोणतेही शुल्क न आकारताच परवानगी दिली. आयुकाच्या वतीने नक्की हे कोण ठरविते, त्याचे निकष काय हे ते सांगत नाहीत. इतकेच नव्हे तर आम्ही सुरुवातीला हे मृत्युपत्र बघण्यास मागितले तेव्हाही ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर माहिती अधिकारामध्ये ही कागदपत्रे मिळवावी लागली’, अशी माहिती जयंत देशपांडे यांनी दिली.

देशपांडे कुटुंबीयांकडून पुलं आणि सुनीताबाई यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टीविषयी करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. सुनीताबाईंनी त्यांच्या हयातीत आयुकाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेला २५ लाखांची देणगी दिली होती. या विज्ञान केंद्राला त्यांनी स्वतः भेट देऊन विज्ञान प्रसाराच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले होते. देशपांडे कुटुंबीयांचे पुस्तकांच्या हक्कांसंबंधी काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करू.

– निरंजन अभ्यंकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आयुका

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here