म. टा. प्रतिनिधी, मुंबई
टॉप समूह घोटाळा प्रकरणात आमदार यांचे पुत्र विहंग यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे. तसे समन्स त्यांना शुक्रवारीच बजावण्यात आला होता. त्यानुसार सोमवार किंवा मंगळवारी चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॉप समुहाला मिळालेले सुरक्षा रक्षकाचे कंत्राट, या कंत्राटापोटी मिळालेली दलाली, त्या दलालीच्या रकमेतून टॉप समुहाच्या माध्यमातूनच परदेशात बेकायेदशीर मालमत्ताखरेदी, परदेशी रकमेचा गैरवापर अशा प्रकारचा हा आर्थिक घोटाळा आहे. या सर्व प्रकरणात टॉप समूहाचे संस्थापक असलेले नंदा कुटुंबीय यांच्यासह अन्य संचालकांनी पैशांचा अनेक ठिकाणी गैरवापर केला. तसेच परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’चे वारंवार उल्लंघन केले, असा ईडीचा संशय आहे. नंदा कुटुंबीय तसेच टॉप समुहाचे संचालक अमित चंदोळे यांच्याशी आमदार सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे जवळचे आर्थिक संबंध आहेत. यासंबंधीच मंगळवारी ईडीने आमदार सरनाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र विहंग यांच्या घरी छापा टाकला होता. त्याच्या दोनच दिवसांनी अमित चंदोळे यांना अटक करण्यात आली. याखेरीज पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचीही चौकशी झाली. चंदोळे व भोसलग यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच विहंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत ईडीतील सूत्रांनी सांगितले की, ‘सरनाईक यांचे सर्व व्यवहार विहंग हेच बघतात. त्यांची मंगळवारी सात तास चौकशी झाली होती. परंतु, अमित यांच्या चौकशीत परदेशी व्यवहारांची आणखी माहिती मिळाल्याने पुन्हा चौकशी होऊ शकते. याचदरम्यान ऑक्टोबरमध्ये यलोगेट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या घोटाळ्यासंबंधीच्या एफआयआरचाही ईडीने अभ्यास केला आहे. त्याआधारे आणखी काही बांधकाम व्यावसायिकांची चौकशी होईल.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here