जळगाव: आपला शेजारी असलेला पाकिस्तान सातत्याने कुरापती करीतच आहे. भारताने पाकिस्तानच्या कुरापत्यांना नेहमी योग्य प्रत्युत्तरही दिले आहे. भारताने याआधी दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवर लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करणार येणार असल्याची माहिती भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. यांनी दिली आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.

वाचा:

यावेळी बोलतांना डा. भामरे यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवाव्यात म्हणून भारताने सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. पण आपण चांगला शेजारी निवडू शकत नाही. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी पाकिस्तानवर दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान सुधारला नाही तर भारत लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करेल, असे डॉ. भामरेंनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार अपयशीच

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एल वर्ष पूर्ण झाले आहे. पण गेल्या वर्षभरात सरकारने जनहिताचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काहीतरी विधायक घोषणा करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्री ठाकरेंनी सूड भावनेतून पाहून घेऊ, अशा प्रकारचे इशारे देत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीने अशी भाषा वापरणे संयुक्तिक नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कोरोनासारख्या महामारीत राज्यातील जनतेचे खूप हाल झाले. कोरोनाच्या नियंत्रणात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. देशात दुर्दैवाने कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात सर्वात गंभीर आहे. राज्यातील मृत्यूदरही चिंताजनक आहे. राज्यातील जनता अक्षरशः हैराण आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, मजूर, सर्वसामान्य नागरिक एवढेच नाही तर विद्यार्थीवर्गही सरकारच्या निष्क्रियतेमुळे नाराज असून, सर्वच घटकात तीव्र असंतोष आहे, असेही डॉ. सुभाष भामरे म्हणाले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटन वाढल्यात

राज्यातील महिला व युवती असुरक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी टीकाही डॉ. भामरेंनी यावेळी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here