आमदार सराफ यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ते आपल्या कारमधून कोतमाच्या सामूहिक भवानासमोरून जात होते. रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटली. त्याला कारमध्ये बसवले. ती व्यक्ती कारमध्ये पाठिमागील सीटवर बसली होती. सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीची ती व्यक्ती असेल असा समज त्यांचा झाला. काही वेळाने धावत्या कारमध्येच मागे बसलेल्या व्यक्तीने आमदारांचा गळा आवळला. आमदार कार चालवत होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कार नियंत्रणाबाहेर गेली. कार रस्त्याखाली उतरली. कशीबशी त्यांनी व्यक्तीच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिघेही कारबाहेर पडले. आमदार आणि त्या व्यक्तीमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचवेळी दुसरी कार आली. त्या कारमध्ये बसून हल्लेखोर व्यक्ती पसार झाली.
हल्लेखोर व्यक्तीने आपण कैल्हारीचे रहिवासी अरूण असल्याचे सांगितले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times