मुंबईः मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या या घोषणेवर भाजपनं सडकून टीका केली असून शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे, असा टोला लगावला आहे.
शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली आहे. यावरून आमदार यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा सेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेनं अजानच्या स्पर्धा जाहीर करणं म्हणजे हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे. अजान आता शिवसेनेला गोड वाटू लागलं आहे. ओवेसींनाही लाज वाटेल इतके धर्मनिरपेक्ष आता झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाहीये, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times