अहमदनगर: तालुक्यातील करंजी जवळील परिसरात मॅंटीस प्रजातीतील नावाचा शाळकरी मुलांना आढळून आला. या किटकाची लांबी १२ ते १५ सेमी असते. हा अतिशय दुर्मिळ असल्याची माहीती येथील जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांनी दिली.

कोल्हेवाडी परिसरात शालेय विद्यार्थी तन्वी अकोलकर, प्रियंका अकोलकर व शिवराम अकोलकर या विद्यार्थ्यांना खेळताना कचर्‍याची हालचाल होताना दिसून आले. सूक्ष्म निरीक्षण केल्यावर तो कचरा नसून जीव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अहमदनगर येथील जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या मुलांनी सचिन अकोलकर यांच्यामार्फत किटकाचे छायाचित्रे व व्हिडिओ काढून ते सातपुते यांना पाठवले. त्यावेळी हा मॅंटीस प्रजातीतील व्हायोलिन मॅंटिस नावाचा किटक असून त्याची लांबी १२ ते १५ सेमी असते. हा अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती सातपुते यांनी विद्यार्थ्यांना देतानाच त्यांच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक केले.

वाचा:

दरम्यान, मॅंटिस प्रजातीतील किटक स्वरक्षणार्थ परिस्थितीशी मिळते जुळते घेवुन निसर्गाशी समरूप होण्यास अग्रेसर असतात. वाळलेल्या पानांप्रमाणे निसर्गाशी साम्य असलेल्या रूपामध्ये त्यांचे शरीर उत्क्रांत झालेले असते. त्यामुळेच त्यांचे वास्तव्य सहजासहजी कोणाच्याही लक्षात येत नाही. कलाशिक्षक स्वदिप खराडे यांनीही अशाच आणखी एका किटकाची नोंद नुकतीच जेऊरजवळील वाकीवस्ती या ठिकाणी केली आहे. भारत व श्रीलंका या देशांमधील काही भागात याचा विशेष नैसर्गिक अधिवास असतो. तसेच लहान असल्यापासुन प्रौढावस्थेपर्यंत तो अनेक वेगवेगळे रंग रूपे बदलतो. ३० ते ४० अंश तापमान व आर्द्रता त्याच्या वाढीसाठी पोषक असते. त्याचे मुख्य अन्न इतर लहान किटक, माशा, फुलपाखरे असून त्याचे शरीर व्हायोलिनच्या आकाराप्रमाणे दिसते. तापमानाच्या बाबतीत ही प्रजाती अतिसंवेदनशिल असल्याने तिचे प्रजनन कमी होते. यामुळेच निसर्गात या किटकांची संख्या अतिशय कमी असून हे दुर्मिळ आहेत ,अशी माहिती जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाचे किटक अभ्यासक प्रतिम ढगे, अमित गायकवाड व सोमनाथ कुंभार यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here