रिओ दि जेनेरियो: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. तर, दुसरीकडे इतर देशांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपात आपला सूर मिळवला आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप केला.

अमेरिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारा ब्राझील हा पहिलाच देश आहे. इतर देशांनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या अथवा अधिकृत निकालाची प्रतिक्षा केली. मात्र, अमेरिकेतील निवडणूक गैरप्रकाराबाबत कोणीही भाष्य केले नाही. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांनी म्हटले की, अमेरिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असल्याची माहिती माझ्याकडे आहे. आपल्याला खास सुत्रांकडून ही ठोस माहिती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आणि बोल्सनारो यांचे चांगले संबंध आहेत. त्यातच आता बोल्सनारो यांनी आता ट्रम्प यांच्याच आरोपाची री ओढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बोल्सनारो यांनी बायडन यांना अद्यापही विजयाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

वाचा:

वाचा:

ईव्हीएमवर मतदान नकोच
बोल्सनारो यांनी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनबाबतही संशय व्यक्त केला. याद्वारे मतदानात गैरप्रकार होण्याची भीती आहे. आगामी २०२२ मधील ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.

वाचा:

एफबीआय आणि न्याय विभागावर ट्रम्प यांचा अविश्वास

अमेरिकेचा न्याय विभाग आणि एफबीआयवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप लगावले आहेत. या विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या गैरप्रकारात सहभागी असू शकतात, असा आरोप त्यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात येतो. काही राज्यांमध्ये ट्रम्प यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. काही राज्यांनी केलेल्या मतमोजणीत ट्रम्प यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here