मुंबई: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं पलटवार केला आहे. ‘भाजपचं एका मुखवट्यावर भागत नाही. त्यांचा मुखवट्यांचा कारखानाच आहे. हे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच, ही भाजपची नीती आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

महाविकास आघाडीसाठी शिवसेनेनं २०१४ सालीही देखील प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी नुकताच केला. त्यावरून विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेला विचारधारेशी काहीही देणंघेणं नाही. त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे,’ असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला कुठलंही लॉजिक नाही. २०१४ साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. कारण त्यावेळी जबरदस्तीनं ठरवलं असतं तरी आकडा जमत नव्हता. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा अभ्यास केला तर स्वत:च्या चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही,’ असा सणसणीत टोला लगावण्यात आला आहे.

वाचा:

वाचा:

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

>> चव्हाण यांच्या दाव्यानं फारशी खळबळ होण्याचं कारण नव्हतं. शिवसेना वा राष्ट्रवादीनं त्यांचं हे वक्तव्य गांभीर्यानं घेतलं नाही. पण फडणवीस दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा प्रयत्न करीत होते. चव्हाण काय बोलले यात आम्हाला पडायचं नाही. पण यानिमित्तानं आपला चेहरा स्वत:च ओरबाडत आहे.

>> २०१४ साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि २५ वर्षांच्या नात्याचा विचार न करता भाजपनं निर्घृण पद्धतीनं शिवसेनेशी असलेली युती तोडली. त्यातून भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण त्यांचं एका मुखवट्यावर भागत नाही.

>> २०१४ साली भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढं आली. तिथं भाजपचा दुसरा मुखवटा गळून पडला. तेव्हा शिवसेनेनं चेहरा लपवला नव्हता. शिवसेना उजळ माथ्यानं वावरत होती.

>> २०१४ साली राष्ट्रवादीनं भाजपला उघड पाठिंबा दिला, त्यामागे भाजपच्या गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती, हे फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. हे सत्य स्वीकारल्यास शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपनं स्वत:चा खरा चेहरा आरशात पाहणं गरजेचं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here