शेतकऱ्यांचे हे आंदोलन कोणत्याही एका राज्याचे नाही. हे आंदोलन एखाद्या शेतकऱ्याचे देखील नाही, तर हे आदोलन देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचे आदोलन आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे शेतकरी नेते म्हणाले. आमचे हे आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू राहील आणि आम्ही मागे हटणार नाही, असे शेतकरी म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘हे केवळ पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन नाही’
केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी छेडलेले आंदोलन हे ऐतिहासिक आंदोलन आहे असे स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ही लढाई शेतकरी आणि सत्तेची लढाई आहे असेही ते म्हणाले. हे आंदोलन भारताच्या लोकशाहीसाठी एक उदाहरणासारखे आहे, असेही ते म्हणाले. आजच्या दिवशी शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी सरकारलाच प्रश्न विचारायला हवेत असे ते म्हणाले. हे आंदोलन काही पंजाबच्याच शेतकऱ्यांचे आंदोलन नाही, तर ३० शेतकरी संघटना हे आंदोलन करत आहेत. देशातील अनेक राज्यांमधील शेतकरी आपापल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करत आहेत, असेही योगेंद्र यादव पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times