राज्यात दिवाळीनंतर करोना बाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही स्थिर होते. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली होती. दिवाळीनंतर रुग्ण बरे होणाऱ्यांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक होती. आज मात्र, हे चित्र उलटं फिरलं आहे. आज करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढल्यानं किंचितसा दिलासा मिळाला आहे. शिवाय करोनामुळं प्राण गमावलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
आज ४ हजार १९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, ३ हजार ८३७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, सध्या करोना बाधित रुग्णांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ इतकी झाली आहे. तर, १६ लाख ८५ हजार १२२ जणांनी करोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात आज ८० रुग्ण दगावले असून सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५९ टक्के इतका आहे.
राज्यात सध्या ९० हजार ५५७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रिकव्हरी रेट आता ९२.३९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०८ लाख ५६ हजार ३८४ चाचण्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ टक्के पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ६ हजार३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times