नगर दौऱ्यावर असताना मंत्री तनपुरे यांनी वांबोरी – नगर रस्त्यावर खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर, खडी योग्य प्रमाणात नसल्याचे तनपुरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तनपुरे चांगलेच संतापले, व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथूनच फोन लावला. खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश तनपुरे यांनी दिले.
तनपुरे वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून म्हणाले, ‘एखाद्या कामासाठी पैसे आणता आणता नाकीनऊ येतात. या पैशाचा असा उपयोग होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. इथला कोण इंजिनियर आहे तो निलंबित झाला पाहिजे. दरवर्षी आपण हेच करत राहायचे का ? मला हे अजिबात चालणार नाही. इथला इंजिनियर उद्याच्या उद्या निलंबित झाला पाहिजे. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. दरवर्षी आपण केवळ खड्डे बुजवत बसवायचे का ?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, तनपुरे यांनी अधिकाऱ्याला फोन करतानाचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे आता संबंधित दोषींवर कारवाई होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times