मुंबई : सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सोमवारी देखील सुरूच आहे. आज मल्टी कमॉडिटी बाजारात सोने ४०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या कमॉडिटी बाजारात सोने प्रती १० ग्रॅम ३६६ रुपयांनी घसरले असून भाव ४७७३३ रुपये आहे. एक किलो चांदीचा भाव ५९३७१ रुपये असून त्यात ८८८ रुपयांची घसरण झाली आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२४० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८२४० रुपये आहे. पुण्यात २२ कॅरेटचा भाव ४७२४० रुपये असून २४ कॅरेटसाठी आजचा सोन्याचा भाव ४८२४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४६८५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५११०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४८८३० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५१०३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४५१९० रुपये असून २४ कॅरेटसाठी ४९३०० रुपये आहे.कार्तिक पोर्णिमेनिमीत्त आज मुंबईतील सराफा बाजार बंद होता.

सोने आणि चांदीच्या किमतीत होणारी घट गुंतवणूकदारांना धक्के देत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या मौल्यवान धातूंच्या किमतीत चांगलीच घसरण झाली आहे. याच काळात शेअर बाजारातही घसरण दिसून आली. यंदा सोन्याने गुंतवणूकदारांना जसा चांगला परतावा दिला, तसाच परतावा शेअर बाजारांनीही दिला. मात्र, आता दोन्हीमध्ये घसरण दिसून येत आहे. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ७,७०० रुपयांची घट झाली आहे.करोनावरील लस दृष्टिक्षेपात असल्याचे वृत्त थडकत असल्याने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here