सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री यांनी केल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राणे यांचा दावा फेटाळतानाच त्यांना उघड आव्हानच दिले आहे. ‘नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत, हे जाणून खेद वाटला’, असा टोला लगावतानाच भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी व कुठे चर्चा झाली याचा तपशील कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असे प्रत्युत्तर मंत्री पाटील यांनी दिले आहे. ( challenged )

वाचा:

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य करून नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. जयंत पाटील स्वतःच भाजपमध्ये येण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला होता. त्याला मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ट्वीटरद्वारे राणे यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, ‘नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत हे जाणून मला खेद वाटला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी मी कधी, कुठे चर्चा केली याचा तपशील मला कळला तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. माझ्यापुरते सांगायचे झाले तर, माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी मध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही, म्हणून हा खुलासा’, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा:

‘मी यांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनास कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील पाच वर्षे सरकारच्या विरोधात विधिमंडळात लढत होतो. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही शरद पवारांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे’, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर देताना राणेंच्या भाजपमधील स्थानावरून टोला लगावला आहे. यावर राणे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते राणे?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज तुम्हाला भाजपात दिसले असते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्याबाबत जयंत पाटील यांची चर्चाही झाली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या टीकेला मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. राज्यात पुढचे सरकार आमचेच असेल असे जयंत पाटील म्हणत आहेत पण, पुढील सरकारमध्ये मी मंत्री असणार असे त्यांना म्हणायचे असेल, असा खोचक टोलाही राणे यांनी लगावला होता. त्यावरून मोठं वादळ उठलं असून जयंत पाटील यांनी तातडीने त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here