सिडनी, : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता रोहित आपल्या रुममधूनही लवकर बाहेर पडू शकणार नाही, असे स्पष्ट मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केले आहे.

स्टार स्पोर्ट्सची बोलताना लक्ष्मण म्हणाला की, ” रोहित शर्माच्याबाबतीत बीसीसीआयने मोठी चूक केली आहे. रोहितला भारतीय संघाबरोबरच ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवे होते. मी जर असतो तर रोहितला भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला पाठवेल असते आणि त्याच्या नावापुढे लिहिले असते की, तो फिट झाल्यावर खेळेल. आता रोहितला सामान्य विमानाने ऑस्ट्रेलियाला जावे लागेल. पण जर रोहित सामान्य विमानाने ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला तर त्याला काही दिवस रुमच्या बाहेरही पडता येणार नाही. या गोष्टीचा विचार बीसीसीआयला करायला हवा होता.”

आयपीएल सुरु असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे रोहित फिट नसल्यामुळे त्याला संघात स्थान देता आले नव्हते. पण त्यानंतर रोहित आयपीएलमध्ये खेळला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा विक्रमी जेतेपदही पटकावले. रोहितला त्यानंतर भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण सध्याच्या घडीला रोहित हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये भारतात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला गेल्यावर त्याला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावेल लागेल. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहितला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरनेही यावेळी बीसीसीआयवर टीका केली आहे. गंभीर यावेळी म्हणाला की, ” रोहित शर्माचे सहजपणे हाताळले जाऊ शकत होते. त्यासाठी एक सोपा उपाय होता. संघ निवडीच्या बैठकीमध्ये जास्त लोकांना संधी देण्याची गरज नव्हती. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, निवड समितीचे अध्यक्ष आणि भारताचे मुख्य फिजिओ यांच्यामध्ये जर चांगला समन्वय झाला असता तर सर्व काही ठिक झाले असते. कर्णधार विराट कोहलीला शास्त्री यांनी सर्व अपटेड्स दिल्या असत्या.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here