नाशिक: येथील परिसरातील एका प्लास्टिक गोदामास सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली. या झोपडपट्टी परिसरात हे गोदाम आहे. घटनेचे वृत्त समजताच अग्निशामक दलाचे बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ( Latest Updates )

वाचा:

वडाळा गाव परिसर हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी व दाट वस्ती आहे. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठी वित्तहानी मात्र झाली आहे. आग आटोक्यात आल्यानंतरच काही गोष्टींचा स्पष्ट खुलासा होऊ शकणार असल्याचे अग्निशामन दलातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

वाचा:

आगीचे लोळ इतके भीषण होते की परिसरात दूरपर्यंत या ज्वाळा नजरेस पडत होत्या. या घटनेने वडाळा गाव परिसरात दहशत पसरली आहे. आग पसरण्याच्या भीतीने रहिवासी घरांबाहेर आले आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दीही झाली आहे. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींसह नागरीकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here