मुंबई: महाराष्ट्रासाठी गेला नोव्हेंबर महिना राजकीय उलथापालथीचा, अनेक धक्के देणारा आणि भूकंप घडवणारा ठरला होता. तेव्हा ३६ दिवस चाललेल्या सत्तानाट्याला आता एक वर्ष सरलं आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि शिवसेना खासदार हे दोन नेते राहिले होते. या दोन नेत्यांच्या अचूक चालींमुळेच राज्यात सरकार विराजमान झालं आणि या सरकारने आता एक वर्षही पूर्ण केलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वर्षपूर्तीनंतर दोनच दिवसांत राऊत यांनी पवारांची भेट घेतल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वाचा:

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख करत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी या सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कोणताही सोहळा करण्यात आला नाही. असे असले तरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेली मुलाखत मात्र विरोधी पक्ष भाजपला डिवचणारी ठरली आहे. केंद्राकडून मिळणारा दुजाभाव, सीबीआय व ईडीमार्फत होणाऱ्या कारवाया, राज्यातील भाजप नेत्यांची आंदोलने, हिंदुत्व अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर तोफ डागली आहे. ही मुलाखत घेणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनाही भाजपकडून लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचवेळी सरकारच्या स्थैर्यावरही नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. हे सरकार पडल्यावर भाजप स्वबळावर सक्षम पर्याय देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार-संजय राऊत यांची भेट महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.

वाचा:

शरद पवार हे सरकारसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत. सरकारच्या कारभारावर त्यांनी वेळोवेळी समाधान व्यक्त केलं आहे तसेच आमची आघाडी भक्कम आहे व सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. आज शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी केलेलं ट्वीटही तसाच विश्वास व्यक्त करणारं आहे. ‘शरद पवार यांना आज भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित’, असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. राऊत यांचं हे ट्वीट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here