चंद्रपूर: ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत ( ) यांची नात व वरोरा येथील आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. ( Latest News Updates )

वाचा:

( ) यांनी येथे आत्महत्या केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेने आमटे परिवारावर खूप मोठा आघात झाला असून आनंदवनात शोककळा पसरली आहे. दुसरीकडे याबाबत पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आनंदवनात दाखल झाले आहेत.

वाचा:

शीतल आमटे यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला आणण्यात आले आहे. त्यांनी आत्महत्या का आणि नेमकी कशी केली?, मृत्यूपूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती काय किंवा अन्य काही पुरावे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक साळवे यांच्यासोबतच वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे हे देखील आनंदवन ( ) येथे दाखल झाले आहेत. नागपूर येथून एक फॉरेन्सिक चमूही आनंदवनात पोहचणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

वाचा:

दरम्यान, शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांनी इंजेक्शन घेतल्याचे लक्षात येताच तातडीने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसे काहीच वेळात घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. डॉ. शीतल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक ताणावाखाली होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचेही बोलले जात आहे. निधनापूर्वी काही तास आधी शीतल यांनी एक पेंटिग ट्वीट केले होते. ‘वॉर अँड पीस’ अशी कॅचलाइन त्याला देण्यात आली आहे. पेंटिगवर त्यांनी स्वत:चे नावही लिहिले आहे. या ट्वीटनंतर त्यांनी उचललेलं आत्महत्येचं पाऊल सर्वांनाच धक्का देणारं ठरलं आहे.

फोटो:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here