वाचा:
पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे हे बंडाचे निशाण फडकावत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यामुळे आधीच या मतदारसंघात काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना पंकजा यांनी मतदानाच्या तोंडावरच अत्यंत महत्त्वाचं असं आवाहन केलं आहे. पंकजा यांनी सोमवारी रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी हे ट्वीट केले असून या ट्वीटमधील मजकुरावरून अनेक तर्क लावले जात आहेत.
वाचा:
पंकजा यांच्या या ट्वीटमधून त्यांची प्रकृती बिघडल्याचेही स्पष्ट झाले आहे. ‘मला सर्दी, खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे… अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि शिरीष बोराळकरांच्या पारड्यात पहिल्या पसंतीची मते टाकून त्यांना विजयी करावे’, असे पंकजा यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. पंकजा यांनी मतदानाच्या काही तास आधी केलेल्या या ट्वीटनंतर मराठवाडा मतदारसंघात नेमकं काय होणार, याची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
मतदारसंघात आधीच मोठी उलथापालथ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. पंकजा यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी येथे भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. तर पंकजा यांनी मात्र भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठी झोकून देऊन प्रचार केल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी शेवटच्या क्षणीही कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून बोराळकर यांच्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने व आपली सारी ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पाठिशी उभी केल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात चांगलीच चुरस वाढली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times