जळगाव: अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी व कैलास रामप्रसाद सोमाणी यांच्या नावावर आहे, असे राष्ट्रवादीचे नेते यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आहेत. झंवर हे हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत. ( On Latest News Updates )

वाचा:

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे दिली. त्यात ‘बीएचआर’ची मालमत्ता मातीमोल भावात घेणाऱ्या ३० व्यक्ती व संस्थांची नावे आहेत. त्यात जळगाव, पुणे, जामनेर, पाळधी (धरणगाव) येथील व्यक्तींचा समावेश आहे. झंवर आणि सोमाणी यांच्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने नशिराबाद येथील दुकानांसाठी १९ लाख ५१ हजार ५०० रुपयांची निविदा भरली असून खरेदी अद्याप बाकी आहे. दुकान क्रमांक १६, १७, १८, १८-अ, कोहिनूर आर्केड, निगडी पुणे) ही मालमत्ता त्यांनी २ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांत खरेदी केली आहे. तसेच प्लॉट नं. ५६८/१० भाग अ, ब, क, ड रांगले निवास घोले रोड पुणे ही मिळकत ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयांत खरेदी करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील दुकान नंबर ३, ४, ५ आनंद प्लाझा या मिळकतीसाठी ९४ लाख ११ हजार एवढी शासकीय निविदा भरली असून अद्याप खरेदी बाकी आहे. योगेश रामचंद्र लोढा (पाळधी ता. धरणगाव) यांनी पिंपळे गुरव, पुणे येथील दुकान नं. ४ हे ४९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांत खरेदी केले आहे, असे या कागदपत्रांवरून दिसत आहे.

वाचा:

या घोटाळ्यात मोठे मासे पण, नामोल्लेख टाळला!

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्याबाबत अनेक दावे केले. गैरव्यवहार करणाऱ्या अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता अगदी कवडीमोल भावात खरेदी केल्या. त्यामुळे ठेवीदारांना खूप मोठा फटका बसला आहे, असा आरोप खडसेंनी केला. जळगाव जिल्ह्यातील जामनेरसह पुण्यातील निगडी येथील काही जमिनी अशाप्रकारे घेण्यात आल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आळा आहे. आता या गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने मी आणखी कोणतीही माहिती जाहीर करू शकत नाही. मला काही मर्यादा आहेत, असे सांगत खडसे यांनी गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या बड्या व्यक्तींचा नामोल्लेख टाळला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here