मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. शिवसेनेच्या नव्या राजकारणामुळं अस्वस्थ असलेल्या हिंदुत्ववादी व मराठीप्रेमी शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मनसेनं सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मनसेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.

चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून खोपकर यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. या आघाडीला त्यांनी ‘सपक महाखिचडी’ची उपमा दिली आहे. पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला सपक महाखिचडी आली आहे. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका… असा धीर ट्विटमधून देण्यात आला आहे. ‘निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ… मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ…’ बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा, असं आवाहन ट्विटमधून करण्यात आलं आहे.

वाचा:

वाचा:

भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची हात धरल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राजकीय अपरिहार्यता बघता आता शिवसेनेला हिंदुत्व व मराठीची भूमिका जोरकसपणे मांडता येणार नाही. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जातं. त्याचाच फायदा उचलून पक्षाला उभारी देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. मुंबईतील गोरेगाव इथं मनसेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे. यात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत. मनसेचा नवा ध्वजही या मेळाव्यातून पुढं आणला जाणार आहे. राज ठाकरे हे मराठीचा मुद्दाच पुन्हा लावून धरतात की भाजपला सोयीस्कर अशी हिंदुत्वाची भूमिका घेतात, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या साऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खोपकर यांनी केलेलं ट्विट महत्त्वाचं मानलं जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here