: लहान मुलांची विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. जय नायडू (रा. गोवा कॉलनी) असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हेशाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात अटकेतील आरोपींच्या घरांची झाडाझडती सुरू केली. रात्री उशिरापर्यंत आरोपीच्या घरांची झडती सुरू होती. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गुन्हेशाखेच्या पोलिसांनी मुलांची विक्री करणाऱ्या रॅकटेचा पर्दाफाश करून शर्मिला विजय खाकसे (वय- ५० रा. इंदोरा ), सुरेंद्र यादवराव पटले (वय- ४४, रा. साईबाबानगर, खरबी), शैला विनोद मंचलवार (वय ३२, रा. बिससानगर, दिघोरी ), पूजा सुरेंद्र पटले (वय- ४०, रा. साईबाबानगर), लक्ष्मी अमर राणे (वय-३८, रा. सुभाषनगर) व मनोरमा आनंद ढवळेला (वय ४५, रा. बारेसनगर, पाचपावली) यांना अटक केली. ते ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तपासादरम्यान शर्मिला ही या रॅकेटची सूत्रधार, तर जय हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी गोवा कॉलनी परिसरात सापळा रचून जयला अटक केली. शर्मिला हिच्याकडून ३ वर्षीय पीडित मुलीची सुटका करण्यात आली. पोलीस तिच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. सध्या मुलगी शिशूगृहात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here