मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘केवळ आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. ()

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ व ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत यांची नात शीतल आमटे यांनी काल विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेनं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो,’ अशी प्रार्थनाही शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

‘वर्ष २०२० काही चांगले गेले नाही. दुःखद घटनांची मालिकाच या वर्षात घडत राहिली. आता वर्ष मावळताना आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कानावर आदळली. जेथे कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलवले गेले तेथेच आणि आमटे कुटुंबातच अशी धक्कादायक घटना घडावी हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. बाबा आमटे यांनी ७२ वर्षांपूर्वी आनंदवनाचे बीज रोवले. त्याचा आता एक विस्तीर्ण महावृक्ष झाला आहे. अत्यंत खडतर मार्गावरून बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबाने आनंदवनाची बैलगाडी पुढे नेली. कुटुंबातील प्रत्येकाने या कार्यास हातभार लावला, त्याग केला. त्यात शीतल आमटेसुद्धा होत्याच. मात्र त्यांनीच अचानक स्वतःचे जीवन संपवून घेतले. त्यांच्या दुर्दैवी आत्महत्येने नाती आणि भावनिक गुंत्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत,’ असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

वाचा:

‘समाजसेवेचा कौटुंबिक वारसा चालविण्याची ऊर्मी आणि जोडीला अनेकविध कामे करण्याची जिद्द, धडपड असूनही डॉ. शीतल आमटे नैराश्याच्या चक्रव्यूहातून स्वतःला बाहेर काढू शकल्या नाहीत. नैराश्यावर मात करण्यासाठी आपण पेंटिंग कलेचा आधार घेत आहोत असे शीतल यांनीच सांगितले होते. मात्र आता अंतिम क्षणी ‘युद्ध आणि शांतता’ अशी कॅप्शन देत आपलेच एक कॅनव्हास पेंटिंग त्यांनी ट्विट केले आणि जीवनाचे रंगच पुसून टाकले. त्यांच्या मनात नेमके कोणते ‘युद्ध’ सुरू होते आणि कोणती ‘शांतता’ त्यांना अपेक्षित होती या प्रश्नांची उत्तरे आता कधीच मिळणार नाहीत,’ असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here